महावितरणचे कामकाज सुरू होतेय उशीरा!
By Admin | Updated: July 12, 2016 00:33 IST2016-07-12T00:33:43+5:302016-07-12T00:33:43+5:30
मालेगाव येथील प्रकार; नागरिकांमध्ये तीव्र संताप.

महावितरणचे कामकाज सुरू होतेय उशीरा!
मालेगाव (जि.वाशिम) : सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या ना त्या कारणांनी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यासंदर्भात काही नागरिकांनी तक्रार देण्यासाठी सोमवार, ११ जुलै रोजी महावितरणचे कार्यालय गाठले असता, सकाळी उशीरापर्यंंत हे कार्यालय चक्क बंद होते. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणप्रती रोष व्यक्त होत आहे.
महावितरणचे शहरी कार्यालय सुरू होण्याची वेळ सकाळी ८ वाजताची आहे. मात्र, ९ वाजल्यानंतरही या कार्यालयात एकाही कर्मचार्याने उपस्थिती दर्शविलेली नव्हती. यासंदर्भात कनिष्ठ अभियंता क्षीरसागर यांना दुरध्वनीवर संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.