शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘रोहयो’च्या कामांत घोटाळा; शंभरावर ग्रामपंचायती चौकशीच्या घेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 4:17 PM

४९१ पैकी केवळ १७३ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे सुरू असून ३१८ ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील गोरगरिब कुटूंबांमधील मजूरांना हक्काचा रोजगार मिळावा, यासाठी अंमलात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये प्रशासकीय यंत्रणेतीलच काही मंडळींनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. यासंदर्भात गत काही महिन्यांपासून तक्रारींचा ओघ वाढला असून शंभरावर ग्रामपंचायती चौकशीच्या घेºयात अडकल्या आहेत. दरम्यान, सद्य:स्थितीत ४९१ पैकी केवळ १७३ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे सुरू असून ३१८ ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भूमिगत पाट, मातीची धरणे, समतल चर, मजगी घालणे, समतल बांध, दगडी संरोधक, दगडमातीचे कक्षबोध (गॅबियन संरचना), सिंचन तलावांमधील गाळ उपसा, सडक पट्टया, कालवा बांध, खोदविहिरी, शेततळी, फलोत्पादन, रेशीम उत्पादन, रोपमळा, वैयक्तिक घरगुती शौचालय, शाळेतील प्रसाधन गृहे, अंगणवाडीतील प्रसाधनगृहे, घनकचरा, सांडपाणी, खेळाची मैदाने उभारणे यासह इतरही विविध स्वरूपातील कामे जॉब कार्डधारक मजूरांना उपलब्ध करून दिली जातात. त्यानुसार, जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील ग्रामीण भागात रोहयोअंतर्गत हजारो कामे करण्यात आली; मात्र त्यासाठी प्राप्त निधीत अनियमितता व गैरप्रकार झाल्याचे मालेगाव तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या प्राथमिक चौकशीदरम्यान निदर्शनास आले. हाच प्रकार इतरही ग्रामपंचायतींमध्ये झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची विशेष तपासणी व सखोल चौकशी स्वतंत्र पथकाकडून करण्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी १० पथक गठीत करून १ एप्रिल २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत रोहयोअंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. यामुळे गैरव्यवहार व अनियमिततेला चालना देणारे ग्रामपंचायतींचे सरपंच, सचिवांसह तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचाºयांचेही धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील इतरही ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून टप्प्याटप्प्याने घोटाळेबाजांवर निश्चितपणे कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

७ महिन्यात केवळ ३२ हजार मजूरांना मिळाला रोजगाररोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १ लाख ९६ हजार २३२ कुटूंबांची जॉब कार्डधारक मजूर कुटूंब म्हणून नोंद झालेली आहे. या कुटूंबांमधील ४ लाख ३३ हजार १८६ मजूर ‘रोहयो’ची कामे करण्यास पात्र आहेत. असे असले तरी १ एप्रिल २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या ७ महिन्याच्या कालावधीत केवळ २० हजार २९ कुटूंबांमधील ३२ हजार ५५४ जॉब कार्डधारक मजूरांनाच रोजगार हमी योजनेंतर्गत कामे मिळाली आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४९१ पैकी केवळ १७३ ग्रामपंचायतींमध्ये ४१३ कामे सुरू असून ३१८ ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नसल्याने मजूर कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.३ ते ३१ डिसेंबरदरम्यान या ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’च्या कामांची होणार चौकशी१ एप्रिल २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत रोहयोअंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशीस ३ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील मारसूळ, गांगलवाडी, वाकळवाडी, पांगराबंदी, देवठाणा खांब, खैरखेडा, राजूरा, सुदी, डव्हा, कवरदरी, वाडी रामराव, पिंपळशेंडा, अमाना, मुसळवाडी, माळेगाव, कुत्तरडोह, कुरळा, खिरडा, किन्हीराजा, सोनाळा, मैराळडोह, जऊळका, उडी, वरदरी खु., खंडाळा, सोमठाणा, शिरसाळा, जोडगव्हाण, पांगरी धनकुटे, दुबळवेल, बोराळा, बोराळा अरंदा, खडकी, खडकी इजारा, एरंडा, अमानी, नागरतास, बोर्डी, बोरगाव, पिंपळा, जामखेड, आमखेडा, हनवतखेडा, पांगरी नवघरे, झोडगा बु., करंजी, शेलगाव बोंदाडे, वाघळूद, चिवरा, ढोरखेडा, वाघी, कोठा, मुंगळा, रेगाव, रिधोरा, डोंगरकिन्ही, पांगरी कुटे, एकांबा, वडप, भेरा, केळी, शेलगाव बगाडे, शिरपूर, तिवळी, किन्ही घोडमोड, दुधाळा, वसारी, तरोडी, उमदरी, ब्राम्हणवाडा, सुकांडा, इरळा, कळंबेश्वर, वारंगी, मालेगाव किन्ही, मसला खु., मेडशी, भौरद, कोळदरा, काळाकामठा, उमरवाडी, चांडस, पांगरखेडा, कोळगाव बु., गिव्हा कुटे या ८६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ज्या ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’च्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला, त्यांची सखोल चौकशी पूर्ण होऊन लवकरच संबंधित दोषींविरूद्ध गुन्हे देखील दाखल होणार आहेत. याशिवाय ‘रोहयो’ची कामे झालेल्या प्रामुख्याने मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये ३ डिसेंबरपासून चौकशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे निश्चितपणे सद्या बहुतांश ठिकाणच्या कामांना ‘ब्रेक’ लागला; मात्र कुशलचा निधी शासनस्तरावरून वेळेत मिळत नसल्याने देखील काही ग्रामपंचायतींनी गत काही महिन्यांपासून कामांची मागणीच नोंदवलेली नाही. यामुळेही ‘रोहयो’मार्फत होणाºया कामांचे प्रमाण कमी झालेले आहे.- हृषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत