लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील काटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया उपकेंद्रांवर होणाºया लसीकरण कार्यक्रमांसाठी ‘व्हॅक्सीन’ पोहचविण्याची जबाबदारी आरोग्य सहाय्यकांवर असते. त्यासाठी संबंधितास ७५ रूपये मोबदला देखील दिला जातो; परंतु आरोग्य सहायकांनी कामात टाळाटाळ चालविल्याने ‘व्हॅक्सीन’ची वाहतूक ‘एमपीडब्ल्यू’ (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी) यांना करावी लागत आहेत. यासाठी मात्र त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नसल्याने त्यांच्यात रोष व्यक्त होत आहे. लसीकरणामुळे बाल्यावस्थेपासून वृध्दावस्थेपर्यंत २५ विविध आजारांपासून संरक्षण मिळते. जगभरात लसीकरण प्रतिबंधक रोगाविरुद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जातात. लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. एक वर्षाच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. दरम्यान, या लसीकरणासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकांना त्या-त्या केंद्राअंतर्गत येणाºया उपकेंद्रामध्ये ज्यादिवशी लसीकरण असते, त्या दिवशी ‘व्हॅक्सीन’ पोहचविण्याची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यासाठी ७५ रूपये मोबदला देखील दिला जातो. मात्र, काटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘व्हॅक्सीन’ची वाहतूक आरोग्य सहाय्यकाऐवजी ‘एमपीडब्ल्यू’ कर्मचाºयांना कुठलाही मोबदला न देता (फुकटात) करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याची माहिती एका कर्मचाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या सर्व प्रकाराची चौकशी वरिष्ठ स्तरावरून व्हावी, अशी मागणीही जोर धरत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रामध्ये लसीकरण मोहिम असेल तर त्या ठिकाणी ‘व्हॅक्सीन’ घेऊन जाण्याची जबाबदारी ही आरोग्य सहाय्यकावरच असते. त्यांना यासाठी ७५ रूपये मोबदलाही शासनाकडून दिला जातो. काटा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘व्हॅक्सीन’ची वाहतुक कोण करतो, याकडे यापुढे कटाक्षाने लक्ष पुरविले जाईल. डॉ. राजेश डावरे तालुका वैद्यकीय अधिकारी, वाशिम
‘व्हॅक्सीन’ वाहतूकीच्या मोबदल्यापासून ‘एमपीडब्ल्यू’ वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:17 IST