कोंडवाडा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली
By Admin | Updated: November 17, 2014 00:01 IST2014-11-17T00:01:48+5:302014-11-17T00:01:48+5:30
वाशिम नगरपालिका प्रशासनाचा खासगी कंत्राटदार नियुक्तीसाठी फेरनिवीदा काढण्याचा निर्णय.
_ns.jpg)
कोंडवाडा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली
वाशिम : गत काही वर्षापासून बंद असलेला शहरातील कोंडवाडा पून्हा सुरू करण्याच्या हालचाली नगर पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. कोंडवाडा चालविण्यासाठी ्रपालिका खासगी कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी फेरनिवीदा काढणार असुन भाडेतत्वावर हा कोंडवाडा चालविण्यात येणार आहे.
शहरात आजमितीला मोकाट जनावरांचा धूमाकूळ वाढला आहे. मात्र, पालिकेचा कोंडवाडा बंद असल्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. लोकमतने १५ नोव्हेंबरच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन नगर पालिकेने कोंडवाडा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आरोग्य निरिक्षक राजेश महाल्ले यांनी याला दुजोरा दिला आहे.
२७ मार्च १२ रोजी कोंडवाडा भाडेतत्त्वावर देऊन चालविण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. १0 मे २0१२ ते ३१ मार्च २0१३ या कालावधीमध्ये कोंडवाडा चालविण्याचा खाजगी ठेका देण्यात आला होता. त्यानंतर मात्र, पालिकेने कोंडवाडा चालविण्यासाठी खासगी कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी निवीदा काढल्या होत्या. परंतु त्याला कंत्राटदारांकडुन प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पून्हा फेरनिवीदा काढण्यात येणार आहेत.
खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करून त्यांच्याकडे कोंडवाडा चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. यापूर्वी कंत्राटदारांच्या नियुक्तीसाठी निवीदा काढल्या होत्या. परंतु त्यावेळी एकाही खासगी कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळेच तेव्हा कोंडवाडा सुरू होऊ शकला नव्हता. आता पून्हा फेरनिवीदा काढून कोंडवाड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका कटिबद्ध असल्याचे आरोग्य निरीक्षक राजेश महल्ले यांनी सांगीतले.