वेगळ्या विदर्भासाठी क्रांतिदिनापासून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 02:00 IST2017-07-25T02:00:51+5:302017-07-25T02:00:51+5:30

मालेगाव : वेगळ्या विदर्भासाठी ९ आॅगस्ट क्रांतिदिनापासून विदर्भातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली.

Movement for a different Vidarbha from the Revolution | वेगळ्या विदर्भासाठी क्रांतिदिनापासून आंदोलन

वेगळ्या विदर्भासाठी क्रांतिदिनापासून आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : वेगळ्या विदर्भासाठी ९ आॅगस्ट क्रांतिदिनापासून विदर्भातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली. २१ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत बोलत होते .
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, जयदेव भाकरे, नारायणराव विभुते, परशराम दहात्रे, विश्वंभर नवघरे, प्रकाश कुटे, प्रदीप पाटील कुटे, रमेश सांगळे आदी उपस्थित होते.
यावेळी चटप म्हणाले, की वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देणारे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री झाले, तर फडणवीस मुख्यमंत्री झाले; परंतु त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी काहीच केले नाही. त्यामुळे ९ आॅगस्टपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Movement for a different Vidarbha from the Revolution