काेराेना संसर्ग संपताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:47 IST2021-08-13T04:47:08+5:302021-08-13T04:47:08+5:30

वाशिम : काेराेना संसर्ग कमी हाेताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या असून विविध कार्यक्रम, आंदाेलने ...

The movement of all political parties gained momentum as soon as the Carina infection ended | काेराेना संसर्ग संपताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान

काेराेना संसर्ग संपताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान

वाशिम : काेराेना संसर्ग कमी हाेताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या असून विविध कार्यक्रम, आंदाेलने करण्यात येत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

काेराेना संसर्गादरम्यान बहुतांश राजकीय पक्षातील नेते मंडळी, लाेकप्रतिनिधी गायब झाले हाेते. काेराेना संसर्ग कमी हाेताच झालेल्या भाववाढीवर, शासनाच्या विविध धाेरणाविरुद्ध राजकीय मंडळी रस्त्यावर उतरत असून आंदाेलने करीत आहेत. तर सत्तेत असलेले पक्ष विविध विकास कामे, बैठका घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्कात दिसून येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमात सहभाग दर्शविण्यात येत असून राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. नुकतेच खासदारांसह एका आजी, माजी आमदारासाेबत शहरातील विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित केला हाेता. तर आमदार अमित झनक यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची भेट घेऊन रिसाेडसह जिल्ह्यातील विकास कामाबाबत चर्चा केली. आमदार पाटणी यांनी आराेग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न उचलून धरला आहे.

Web Title: The movement of all political parties gained momentum as soon as the Carina infection ended