मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाटच!

By Admin | Updated: January 14, 2017 01:21 IST2017-01-14T01:21:09+5:302017-01-14T01:21:09+5:30

तामशी येथील घटना.

Mourning the accused in the murder case! | मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाटच!

मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाटच!

वाशिम, दि. १३- शेतीच्या वादातून एकास जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील तामशी येथील शेतशिवारात ११ जानेवारीला घडली; मात्र दोन दिवस उलटूनही घटनेतील आरोपी अद्याप मोकाटच आहेत. तामशी येथील शेतकरी जनार्धन शिवाजी लव्हाळे हे त्यांच्या शेतातील तूर कापत असताना रमेश कव्हर, मधुकर कव्हर, विठ्ठल कव्हर यांनी क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत लोखंडी साहित्याने लव्हाळे यांच्या डोक्यावर घाव करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लव्हाळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रमेश कव्हर, मधुकर कव्हर, विठ्ठल कव्हर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला, मात्र संबंधित सर्व आरोपी अद्याप मोकाटच आहेत.

Web Title: Mourning the accused in the murder case!