मोटारसायकलचा अपघात, एक ठार
By Admin | Updated: June 5, 2014 00:58 IST2014-06-05T00:54:44+5:302014-06-05T00:58:43+5:30
रस्त्यावर पडलेल्या झाडावर आदळुन अपघात; लोकमत ने वेधले होत लक्ष पण रस्ते विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

मोटारसायकलचा अपघात, एक ठार
मंगरुळपीर : नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावरील लाठी गावानजीक विजेच्या शार्टसर्कीटमुळे जळून चार दिवसांपासून रस् त्यावर पडलेल्या वृक्षाला मोटारसायकल धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना ३ जूनच्या रात्री ११.१५ वाजताचे सुमारास घडली.या पडलेल्या वृक्षामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने २ जूनच्याच अंकात प्रकाशित केली होती. तरीही रस्ते विकास महामंडळांने तो वृक्ष तेथून न हटविल्याने हा अपघात झाला. नागपुर-औरंगाबाद दृतगती मार्गावर लाठी गावाजवळ ३0 मे रोजी विजेच्या शार्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत बाभळीचे झाड जळून रस्त्यावर पडले. या घटनेला ४ दिवस उलटुनही सदर झाड रस् त्यावरून हटविण्यात आले नाही.३ जूनच्या रात्री मालेगाव तालु क्यातील सोनाळा येथील नागेश पुंडलीकराव वानखेडे (वय ५0) व प्रवीण चौधरी (वय २७) हे दोघेजण एम एच ३७ एम ४१0४ या क्रमांकाच्या डिस्कव्हर मोटारसायकलने शेलूबाजार येथून घरी परत जात असताना रस्त्यावर पडलेला वृक्ष त्यांना दिसला नाही.त्यामुळे त्यांची मोटारसायकल वृक्षावर जाऊन आदळली. या अपघातात नागेश वानखेडे व प्रवीण चौधरी गंभीर जखमी झाल.गस्ती पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी शेलूबाजार येथे आणले.तेथूनवाशिमला रवाना करण्यात आले.मात्र, वाशिमला पोहोचून उपचार होण्यापुर्वीच वानखेडे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले प्रवीण चौधरी यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले.