विजेच्या धक्क्याने तीन वर्षाच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू
By Admin | Updated: May 23, 2017 00:23 IST2017-05-23T00:23:39+5:302017-05-23T00:23:39+5:30
कुलरमध्ये पाणी टाकताना घडली शेलुबाजार येथे घटना

विजेच्या धक्क्याने तीन वर्षाच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर : कुलरमध्ये पाणी टाकत असताना तीन वर्षाच्या चिमुकलीसह आईचा करूण अंत झाल्याची घटना मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे सोमवार, २२ मे रोजी रात्री ८.३0 वाजता घडली.या घटनेत अर्चना डोफेकर (वय ३0) या महीलेचा आणि तीच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. शेलुबागार पोलीस चौकीचा भ्रमणध्वनी बंद होता तर ज्या मंगरूळपीर पोलीस स्टेशन अंतर्गत शेलुबाजार येथे तेथील ठानेदारांना रात्री ११ .३० वाजेपर्यंत या घटनेची काहीच कल्पना नव्हती .