शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

समीर वानखडेंच्या समर्थनार्थ वाशिमात मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2021 5:48 PM

Sameer Wankhede: ६ नोव्हेंबर रोजी वाशिम शहरात मोर्चा काढण्यात आला.

वाशिम : ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखडे यांच्या समर्थनार्थ वरूड तोफा (ता.रिसोड) येथील नातेवाईक सरसावले असून, ६ नोव्हेंबर रोजी वाशिम शहरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरूद्ध अनु. जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.सुपरस्टार शाहरूख खान यांच्या मुलावर कारवाई केल्यानंतर समीर वानखडे प्रकाशझोतात आले असून, गेल्या महिनाभरापासून मंत्री नवाब मलिक हे वानखडे यांच्या विरोधात बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर समीर वानखडे यांचे मूळ गाव असलेल्या वरूड तोफा (ता.रिसोड) येथील नातेवाईक व नागरीक आक्रमक झाले असून, शनिवारी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाला सुरूवात झाली. शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चा धडकताच विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदारांना देण्यात आले. नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्या विरोधात बोलणे बंद केले नाही तर महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे नातेवाईक रोहित वानखडे यांनी सांगितले. गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदनराज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात अट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी समीर वानखडे यांच्या नातेवाईकांनी यावेळी केली. गुन्हे दाखल करावे, अशा मागणीचे निवेदन वाशिम शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले. वरीष्ठ स्तरावर निवेदन पाठविणार असल्याचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेwashimवाशिम