पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 07:23 PM2020-10-13T19:23:40+5:302020-10-13T19:24:22+5:30

रिसोड तहसिल कार्यालयासमोर शेतकयांसह भव्य मोर्चा काढला

Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana demanding crop compensation | पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

पीक नुकसानभरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

googlenewsNext

भरपाई न दिल्यास मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरा करण्याचा इशारा : शेतकºयांची लक्षणीय उपस्थिती
रिसोड : अतिपावसाने सोयाबीन, कापूस, मका व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १३ आॅक्टोबर रोजी रिसोड तहसिल कार्यालयासमोर शेतकयांसह भव्य मोर्चा काढला. यावेळी अतिपावसाने खराब झालेले सोयाबीन तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी आणून टाकले. 
शनिवार, रविवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. अद्याप पंचनामे सुरू झाले नाहीत. त्यामुळे भरपाई मिळेल की नाही? याबाबत साशंकता आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रिसोड तहसिल कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी २५  हजार नुकसानभरपाई मिळणार नाही; तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, संपूर्ण विदर्भ-मराठवाड्यात नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभे करणार करणार असून, त्याची सुरूवात रिसोड येथून झाली. सरकारने शेतकºयांना लवकर नुकसानभरपाई दिली नाही तर येणारी दिवाळी ही शेतकºयांसह मंत्र्यांच्या घरी साजरी करू, असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला. सकाळपासून शेतकºयांसह तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारून बसल्यानंतर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. तहसीलदार आशिष शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तात्काळ पंचनाम्याचे आदेश देवून लवकरच नुकसान भरपाईसाठी सकारात्मक अहवाल पाठविणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे विदर्भप्रमुख दामूअण्णा इंगोले यांच्यासह शेतकरी, पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Web Title: Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana demanding crop compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.