वाशिममध्ये ‘मान्सून’पूर्व विकास कामांची घाई
By Admin | Updated: June 6, 2017 14:05 IST2017-06-06T14:03:33+5:302017-06-06T14:05:39+5:30
येत्या ७ जूनपासून राज्यात मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम पालिकेच्यावतीने आवश्यक विकास कामे करण्याची घाई केली जात आहे.

वाशिममध्ये ‘मान्सून’पूर्व विकास कामांची घाई
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - येत्या ७ जूनपासून राज्यात मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम पालिकेच्यावतीने आवश्यक विकास कामे करण्याची घाई केली जात आहे.
वाशिम शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार योजनेचे चेंबर बांधण्यासह नाल्यांची बांधणी पालिकेकडून करण्यात येत आहे. त्याशिवाय शहरातील मुख्य चौक असलेल्या पाटणी चौकापासून बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणा-या सिमेंट रस्त्याच्या कामालाही वेग पालिकेने दिला आहे.
या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक काम कसे करता येईल, याचा प्रयत्न पालिकेकडून सध्या करण्यात येत आहे. शहरातील भूमिगत गटारांचे चेंबरही पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
त्यामुळे विकास कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सध्या वाशिम पालिकेकडून केला जात आहे.