पोहा येथे माकडांचा धुमाकूळ
By Admin | Updated: February 2, 2015 23:56 IST2015-02-02T23:56:53+5:302015-02-02T23:56:53+5:30
बालकावर जीवघेणा हल्ला; २0 शेतकरी जखमी.

पोहा येथे माकडांचा धुमाकूळ
पोहा (जि. वाशिम) : येथे माकडांनी धुमाकूळ घातला असून १ फेब्रुवारी रोजी ११ वर्षी बालकावर जीवघेणा हल्ला केला आहे. माकडांनी आतापर्यंत गावातील तब्बल २0 शेतकर्यांवर हल्ले करून जखमी केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.
रविवारी गावातील मोबिनशहा गफ्फुरशहा हा ११ वर्षीय बालक शेळ्या चारण्यासाठी रानातील संजय पाटील दहातोंडे यांच्या शेताकडे गेला असता तेथे माकडांचा कळप बसून होता. या कळपाने अचानक मोबिनच्या अंगावर हल्ला चढविला. ज्यामध्ये मोबिनचा गाल, डोके, छातीवर जखमा झाल्या. माकडांनी अचानकपणे हल्ला केल्याने मोबिन भेदरून गेला. त्याने आरडाओरड केली असता परिसरातील शेतातील मजूर घटनास्थळी धावून येताच माकडे पळून गेली. मजुरांनी बालकास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
माकडांनी येथील २0 शेतकर्यावर आतापर्यंत हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कारंजा वनविभागाकडे केली आहे.