माकडाची दहशत: अनसिंग कडकडीत बंद

By Admin | Updated: December 31, 2014 00:20 IST2014-12-31T00:20:12+5:302014-12-31T00:20:12+5:30

माकडाचा बंदोबस्त करण्याच्या मागणी; माकडास पकडण्यात कर्मचा-यांना अपयश.

Monkey Panic: Anishing Off Fasteners | माकडाची दहशत: अनसिंग कडकडीत बंद

माकडाची दहशत: अनसिंग कडकडीत बंद

अनसिंग (वाशिम): गत एक महिन्यापासून धुमाकूळ घालून ग्रामस्थांना त्रस्त करून सोडणार्‍या माकडाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी, वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापार्‍यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे, बंद १00 टक्के यशस्वी झाला असला तरी, माकडाचा उच्छाद मात्र कायमच आहे.
अनसिंग येथे एक महिन्यापासून एका माकडाने धुमाकुळ घातला असून, माकडाचे लक्ष ज्या व्यक्तीवर जाते, तिच्यावर तो हल्ला करित आहे. गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, माकडाच्या उच्छादाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंजुरांवर कामधंदा सोडून कुटुंबावर लक्ष देण्याची वेळ आली असून, त्यामुळे त्यांचा रोजगारच बंद झाला आहे. त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यापार्‍यांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. लोकमतने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर, वनविभागाचे जवळपास ३0 कर्मचारी मंगळवारी अनसिंगमध्ये दाखल झाले. नियोजन करूनही कर्मचार्‍यांना माकडास पकडता आले नाही.

Web Title: Monkey Panic: Anishing Off Fasteners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.