पर्यावरणपूरक होळीचा संदेश देण्यासाठी चिमुकले सरसावले !
By Admin | Updated: March 9, 2017 15:48 IST2017-03-09T15:48:35+5:302017-03-09T15:48:35+5:30
पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी वाशिम येथील एस.एम.सी. इंग्लीश स्कूलचे विद्यार्थी, राष्ट्रीय हरित सेना व इको क्लबचे सदस्य सरसावले आहेत.

पर्यावरणपूरक होळीचा संदेश देण्यासाठी चिमुकले सरसावले !
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ९- रासायनिक रंगांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यासाठी वाशिम येथील एस.एम.सी. इंग्लीश स्कूलचे विद्यार्थी, राष्ट्रीय हरित सेना व इको क्लबचे सदस्य सरसावले आहेत. गुरूवारी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांनी ह्यरंग उधळा; पण जरा जपूनह्ण असा संदेश दिला. धूळवडीच्या दिवशी वापरण्यात येणारे रासायनिक रंग मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतात. रासायनिक रंगांचे दुष्परिणाम निदर्शनात आणून देणे आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन करणे या दुहेरी उद्देशातून एस.एम.सी. इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर मोहिम उघडली. प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजित जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला.