अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By Admin | Updated: February 11, 2015 01:03 IST2015-02-11T01:03:32+5:302015-02-11T01:03:32+5:30
लोणार तालुक्यातील घटना.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोणार (बुलडाणा) : तालुक्यातील पांग्रा डोळे येथे १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घडली. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, पांग्रा डोळे येथील १४ वर्षीय युवती दळण दळून आपल्या घराकडे येत होती. यादरम्यान गावातीलच विजय शंकर कालापाड, तुका विलास सोनार, सोपान नारायण शिंदे यांनी या युवतीचा हात धरून तिचा विनयभंग केला. युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन लोणार पोलिसांनी विजय शंकर कालापाड, तुका विलास सोनार, सोपान नारायण शिंदे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नारायण गिते, पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव हे करीत आहेत.