विवाहितेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:04 IST2017-07-19T01:04:13+5:302017-07-19T01:04:13+5:30
मानोरा : तालुक्यातील उमरी बुद्रूक येथील महिला पतीसह घरात झोपलेली असताना, आरोपी संदीप प्रल्हाद आडे याने घरात घुसून विनयभंग केल्याची तक्रार १८ जुलै रोजी दिली.

विवाहितेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील उमरी बुद्रूक येथील महिला पतीसह घरात झोपलेली असताना, आरोपी संदीप प्रल्हाद आडे याने घरात घुसून विनयभंग केल्याची तक्रार १८ जुलै रोजी दिली. यावरून संदीप आडेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
उमरी येथील महिला ही आपल्या घरात पतीसह झोपलेली असताना आरोपी संदीप आडे याने वाईट उद्देशाने घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. यासंदर्भात फिर्यादी व तिच्या पतीने नमूद आरोपीचे वडील प्रल्हाद आडे यांना हकिकत सांगितली असता, वडिलाने फिर्यादीस व तिच्या पतीस अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास बिट जमादार शिवा राठोड, ईश्वर बाकल, आकाश बाभूळकर करीत आहेत.