भारिप उमेदवाराविरूध्द अचारसंहितेचा गुन्हा

By Admin | Updated: September 26, 2014 23:56 IST2014-09-26T23:49:04+5:302014-09-26T23:56:58+5:30

वाशिम येथे भारिप-बमसच्या उमेदवाराने रॅलीची वेळ पाळली नाही : कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल.

Model code of conduct against Bharp candidate | भारिप उमेदवाराविरूध्द अचारसंहितेचा गुन्हा

भारिप उमेदवाराविरूध्द अचारसंहितेचा गुन्हा

वाशिम : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढताना दिलेल्या वेळेचे बंधन न पाळल्यामुळे भारिप- बहुजन महासंघाच्या उमेदवारासह १00 कार्यकर्त्यांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये २६ सप्टेंबर रोजी करण्यात आला. वाशिम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघामध्ये भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने मिलींद सखाराम पखाले यांनी २६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठ त्यांनी वाशिम शहरामधून रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीसाठी पोलिस प्रशासनाने दुपारी १ ते ३ या वेळेत परवानगी दिली होती; मात्र वेळेच्या आत रॅली आटोपली नाही. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय काकडे यांच्या तक्रारीवरून वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये उमेदवार मिलींद पखाले, जे. एस. शिंदे, रविंद्र मोरे, अनंत तायडे, रवी पट्टेबहाद्दुर, श्याम खरात यांच्यासह ९0 ते १00 कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Model code of conduct against Bharp candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.