मोबाइल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

By Admin | Updated: February 13, 2016 01:59 IST2016-02-13T01:59:26+5:302016-02-13T01:59:26+5:30

आरोपीला शहर पोलिसांनी १२ फेब्रुवारीला अटक केली.

Mobile sneaky police net | मोबाइल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

मोबाइल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

वाशिम: शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांनी चाजिर्ंगला लावलेले मोबाइल लंपास करणार्‍या आरोपीला शहर पोलिसांनी १२ फेब्रुवारीला अटक केली. सदर आरोपीचे नाव जगन तुकाराम भिसे (रा. निमजगा, वाशिम) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे नातेवाईक प्रतीक्षा हॉलमध्ये मोबाइल चाजिर्ंगला लावतात. त्यांचे लक्ष चुकवून मोठय़ा शिताफीने मोबाइलची चोरी करणार्‍या आरोपीचा शोध घेण्याची मोहीम बर्‍याच दिवसांपासून शहर पोलीस राबवित होते. या मोहिमेंतर्गत पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव, योगेश धोत्रे, जमादार मनोहर अष्टोनकर, धनंजय अरखराव, सतीश गुडदे व अमोल गिर्‍हे यांच्या पथकाने जगन तुकाराम भिसे याला ताब्यात घेऊन मोबाइल हस्तगत केला. आरोपी भिसे याने शहरातील बर्‍याच मोबाइल दुकानदारांना मोबाइल विक्री केल्याची कबुली दिली.

Web Title: Mobile sneaky police net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.