मोबाइल बॅटरीचा स्फोट; बालक जखमी
By Admin | Updated: October 29, 2016 02:27 IST2016-10-29T02:27:50+5:302016-10-29T02:27:50+5:30
रिसोड शहरातील घटना.

मोबाइल बॅटरीचा स्फोट; बालक जखमी
रिसोड, दि. २८- शहरातील अमरदासनगर येथील १३ वर्षीय बालकाच्या खिशातील मोबाइल बॅटरीचा स्फोट झाला. २८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत सलमान खान नामक बालक जखमी झाला.
खिशामध्ये मोबाइल बॅटरी घेऊन फिरत असताना, बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यामध्ये तो जखमी झाला असून सतर्कता बाळगून त्याने बॅटरी तत्काळ बाहेर फेकून दिली. या घटनेत सलमानच्या मांडिवरचा काही भाग जळाला आहे.
स्फोट झालेली खिशामधील बॅटरी बाहेर फेकून देताना, सलमानच्या हाताच्या बोटाला चटके बसले. त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.