रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे भजन-कीर्तन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:47 IST2021-08-21T04:47:01+5:302021-08-21T04:47:01+5:30

सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनसिंग ते वारला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार होत आहेत. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न ...

MNS's Bhajan-Kirtan movement for road repairs | रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे भजन-कीर्तन आंदोलन

रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे भजन-कीर्तन आंदोलन

सध्या पावसाळ्याचे दिवस असून अनसिंग ते वारला रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार होत आहेत. वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दैनंदिन किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या रस्त्यावरून वाई, झोडगा, टनका, जयपूर, निंबाळवाडी, ढिल्ली, कृष्णा, उकळी आदी गावांतील लोकांची वाहनांव्दारे ये-जा सुरू असते. त्यामुळे शेकडो ग्रामस्थ या समस्येमुळे हैराण झाले आहेत. अखेर ‘मनसे’ने हा विषय गांभीर्याने घेऊन शुक्रवारी नादुरुस्त रस्त्यावर धडक देऊन भजन-कीर्तन आंदोलन पुकारले. याहीऊपर प्रशासनाने दखल घेऊन रस्ता दुरुस्त न केल्यास आक्रमक पवित्रा उचलला जाईल, असा इशारा देण्यात आला.

..............

बाॅक्स :

रस्ता दुरुस्तीबाबत प्रशासनाची उदासीनता

१० गावांचा दैनंदिन संबंध येत असलेल्या अनसिंग-वारला रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे केली; मात्र हा प्रश्न निकाली काढण्याकामी प्रशासनाने उदासीनता बाळगली आहे. यामुळे सर्वच गावांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे.

Web Title: MNS's Bhajan-Kirtan movement for road repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.