मनरेेगा, जलसाक्षरतेसाठी थाटले मोफत प्रशिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:55+5:302021-04-05T04:36:55+5:30
या केंद्राचे उद्घाटन ४ एप्रिल रोजी चकवा येथे करण्यात आले. यावेळी सरपंच एल.एस. गारवे, आशिष थेर, वासुदेव मनवर, सागर ...

मनरेेगा, जलसाक्षरतेसाठी थाटले मोफत प्रशिक्षण केंद्र
या केंद्राचे उद्घाटन ४ एप्रिल रोजी चकवा येथे करण्यात आले. यावेळी सरपंच एल.एस. गारवे, आशिष थेर, वासुदेव मनवर, सागर बलखंडे, दिनेश वाघमारे, अनिकेत मनवर, महेंद्र इंगोले उपस्थित होते. जिल्हा समृद्ध करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत मनरेगा, जलसाक्षरता, सेंद्रिय शेती हा विषय योग्य पद्धतीने पोहचावा याकरिता ते मोफत प्रशिक्षण केंद्र चकवा येथे किंवा शेतकऱ्यांच्या गावात, बांधावर देत आहेत. सेंद्रिय शेतीसाठी कृषिभूषण शिवराम घोडके आणि बळीराजा कृषी विज्ञान मंडळ, लोळदगाव (जि. बीड) आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती, प्रगतिशील शेतकरी केशव भगत यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
लोकांच्या मागणीनुसार प्रशिक्षणाचे नियोजन केले जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय आणि तीन दिवसीय निवासी व अनिवासी प्रशिक्षण असेल, अशी माहिती जलदूत इंगोले यांनी दिली. (११)