शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांना आमदारांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 6:10 PM

नुकसानाची पाहणी करण्यासाठी कारंजा-मानोरा तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटणी नुकसानग्रस्त भागांना भेटी देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गुरुवारी मानोरा तालुक्यात प्रचंड पिक नुकसान झाले, रस्ते खरडले, तसेच घरांची पडझड झाली. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कारंजा-मानोरा तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटणी नुकसानग्रस्त भागांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली असून, आर्थिक मदतीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात तब्ब्ल २० दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने रुद्र रूप धारण केल्याने मानोरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले, तसेच घरांची पडझडही झाली. त्याशिवाय म्हसणी-इंझोरी हा रस्ताच पावसात वाहून गेला. या सर्व नुकसानाची पाहणी करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा काढला आहे. या अंतर्गत शुक्रवारी इंझोरी येथे पाहणी केल्यानंतर शनिवार १८ आॅगस्ट रोजी त्यांनी दापुरा खु. येथे भेट दिली. पावसामुळे दापुरा खु येथील विजयदत्त श्यामसुंदर यांच्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, तसेच इतर ग्रामस्थांच्या घराची व गावातील पुलाचीसुद्धा पडझड झाली. गावातील अनेक रस्ते हे वाहून गेले आहेत. या सर्व नुकसानाची माहिती गावकºयांनी आमदार पाटणी यांना दिली. यावेळी आमदार पाटणी यांनी गावकºयांशी संवाद साधत शासनाकडून तात्काक आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार डॉ सुनिल चव्हाण, पं.स. सदस्य मधुसूदन राठोड, सरपंच भारत दरेकर, चव्हाण, गजानन डहाके व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी