केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आजी-माजी लोकप्रतिनिधींमधून संमिश्र प्रतिक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:51+5:302021-02-05T09:28:51+5:30
कोट केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प असमाधानकारक आहे. जीएसटी व इतर करांबाबत यामध्ये काहीच दिले नाही. शैक्षणिक धोरण व्यवस्थित ...

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आजी-माजी लोकप्रतिनिधींमधून संमिश्र प्रतिक्रिया!
कोट
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प असमाधानकारक आहे. जीएसटी व इतर करांबाबत यामध्ये काहीच दिले नाही. शैक्षणिक धोरण व्यवस्थित नाही. शेतकऱ्यांसाठीदेखील ठोस काहीच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.
- भावना गवळी
खासदार
००
कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार हिरावला. उद्योग-व्यवसाय ठप्प होते. केंद्रीय अर्थसंकल्पातून बेरोजगार, व्यावसायिकांसाठी आशादायी योजना, उपक्रम अमलात येतील, अशी अपेक्षा होती. परंतु, या अर्थसंकल्पाने या सर्वांचा भ्रमनिरास केला.
- अनंतराव देशमुख
माजी खासदार
०००
या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काही ठोस नाही. विविध उद्योगधंद्यांना बूस्टर डोज मिळेल, असे वाटत होते. परंतु अपेक्षांची पूर्तता नाही. चार, पाच राज्यांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी केल्याची शंका येते.
- अमित झनक, आमदार
०००००
देशाच्या विकासासाठी चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. म्हणूनच शेअर मार्केट आज जबरदस्त वधारले आहे. शेतकरी, रेल्वे, उद्योग, रोजगार, आत्मनिर्भर भारत यांना चालना देणारा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणसावर कोणताही कर लादला गेला नाही.
- राजेंद्र पाटणी, आमदार
००००
कोरोनाकाळात शैक्षणिक संस्थांसह विविध उद्योग, व्यवसाय ठप्प होते. शेतकऱ्यांनादेखील जबर फटका बसला. अशा परिस्थितीत अर्थसंकल्प हा सर्वांसाठी दिलासादायक ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता या अर्थसंकल्पातून झाली नाही. शैक्षणिक क्षेत्रातही भरीव तरतूद नाही.
- अॅड. किरणराव सरनाईक, आमदार
००००
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचाच भात’ असा हा प्रकार आहे. पेट्रोल, डिझेलवर जादा कर लावण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनता तसेच शेतकरीबांधवांना फायद्याऐवजी नुकसानदायक आहे. हा अर्थसंकल्प अत्यंत असमाधानकारक आहे.
- सुरेश इंगळे, माजी आमदार
००००००००
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा देशहिताच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक आहे. आरोग्य, सुरक्षा, कृषी, उद्योग-व्यापार, रोजगार आदी सर्वांगीण बाबींचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात करण्यात आला.
- लखन मलिक, आमदार
००००
केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजकांची मोठी निराशा केली आहे. कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार गेल्यामुळे रोजगारविषयक ठोस तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, अपेक्षापूर्ती झाली नाही.
- सुभाषराव ठाकरे, माजी राज्यमंत्री
०००००
केंद्रीय अर्थसंकल्प हा अत्यंत समाधानकारक आहे. ग्रामीण भागातील कृषी व उद्योगधंद्यांना चालना देणारा अर्थसंकल्प आहे.
- अॅड. विजयराव जाधव, माजी आमदार
००
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, शिक्षण, उद्योग क्षेत्रासाठी भरीव काहीच नाही.
- प्रकाश डहाके, माजी आमदार