अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: December 29, 2015 02:08 IST2015-12-29T02:08:33+5:302015-12-29T02:08:33+5:30
दोन आरोपींवर गुन्हा दाखल.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार
वाशिम : इनामदारपुरा परिसरात असलेल्या उदरु शाळेच्या मागे दोन युवकांनी एका १२ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी घडली. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये २८ डिसेंबर रोजी पीडित बालिकेने फिर्याद दाखल केली. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी व तिची मैत्रीण या दोघी उदरु शाळेमागे शौचास गेल्या होत्या. अज्ञात दोन युवकाने पीडित बालिकेचा हात धरून जबरदस्तीने शाळेमागे नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर पीडित मुलीने तिच्यावरील अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली; परंतु दोन दिवस उलटूनही घटनेची फिर्याद न देण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (ड), ३७६ (आय)(जे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. ई. विल्लेकर करीत आहेत.