शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नंबर प्लेटचा रंग बदलवून केली जातेय लाखोंची कर चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 15:56 IST

परमिट असलेल्या वाहनांवरील पिवळ्या रंगाची नंबरप्लेट बदलवून त्याजागी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे.

धनंजय कपाले ।लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुंबई, पुणे, नागपूर, हैद्राबाद यासारख्या बड्या शहरांमधून टुरिस्ट परवाना असलेली वाहने (परमिट) अल्प दरात खरेदी करण्याचा ओघ अलीकडच्या काळात चांगलाच वाढला आहे. परमिट असलेल्या वाहनांवरील पिवळ्या रंगाची नंबरप्लेट बदलवून त्याजागी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. यामाध्यमातून शासनाचा लाखो रूपयांचा कर चोरी करण्याची नविन शक्कल वाहनधारकांनी शोधून काढल्याचे दिसून येत आहे.टुरिस्ट परवान्याची मुदत ही पाच वर्षांची असते, त्यानंतर परवाना नुतनीकरण करावा लागतो. असे असताना मोठ्या शहरामध्ये टुरीस्ट परवान्याची वाहने चार ते पाच वर्षापर्यंत वापरली जातात. त्यानंतर ही वाहने एजंटांमार्फत छोट्या शहरातील ग्राहकांना विकली जातात. टुरिस्ट परवानाधारक व्यक्तीस अथवा कंपनीस व्यवसाय कर भरणे आवश्यक असते. व्यवसायकराची वसुली आरटीओ कार्यालयात केली जाते. खासगी कारचा कर व टुरिस्ट कारचा कर यामध्ये एक महत्त्वाचा फरक असतो, तो म्हणजे टुरिस्ट कारचा कर वार्षिक किंवा त्रैमासिक पद्धतीने भरणा करावा लागतो, तर खासगी कारचा कर एकरकमी भरावा लागतो. टुरिस्ट कारसाठी दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र, विमा, अधिकार नुतनीकरण करून घेणे गरजेचे असते. फिटनेस प्रमाणपत्र जर वेळेवर नुतनीकरण केले नाही, तर कमीत किमान हजार आणि प्रति उशिराच्या दिवसासाठी एक दिवस निलंबन किंवा शंभर रुपये प्रतिदिवस तडजोड शुल्क भरावा लागतो. हे टाळण्यासाठी नंबर प्लेटचा रंगच बदलवून टाकला जात आहे.वैयक्तिक वापरासाठी असलेल्या वाहनांवर पांढºया रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते. तसेच प्रवासी वाहतुक करण्यासाठी असलेल्या वाहनांवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट, विदेशी प्रतिनिधींसाठी असलेल्या वाहनांवर निळ्या, व्यावसायिक कामांसाठी वापरल्या जाणाºया वाहनांवर काळ्या, राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या वाहनांवर लाल, सैन्यदलाच्या वाहनांवर अ‍ॅरो असलेली नंबर प्लेट; तर बॅटरीवर चालणाºया वाहनांवर हिरव्या रंगाची नंबरप्लेट लावलेली असणे नियमानुसार बंधनकारक आहे.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस