यावेळी शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजुसे यांनी सोयाबीन, कपाशी या मुख्य पिकांचा उत्पादन आलेख शेतकऱ्यांच्या मदतीने काढून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्चात कपात कशी होईल, याबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक गजानन राऊत व समूह सहायक आशिष गवई यांनी प्रभात फेरी घेऊन गावातील मैदानावर गाव नकाशा काढून गावाबाबत माहिती दिली व प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षक मंगेश सुरजुसे यांनी महिला शेतकऱ्यांना निर्णयक्षम बनण्याकरिता ‘निर्णयक्षम’ हा समूहरंजन खेळ घेऊन महिला निर्णयक्षम होणे ही काळाची व आधुनिक शेतीची गरज आहे, असा संदेश समूहरंजन खेळातून देण्यात आला. यावेळी कृषी सहायक गजानन राऊत, शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजुसे, समूह सहा. आशिष गवई, सरपंच शोभा रंगे, उपसरपंच आरती लोखंडे, पोलीस पाटील पाढोणे, ग्रामसेवक एम.आर. राऊत व गावातील महिला-पुरुष प्रगतिशील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:47 IST