गणरायाला आज निरोप
By Admin | Updated: September 15, 2016 02:58 IST2016-09-15T02:58:46+5:302016-09-15T02:58:46+5:30
पहिल्या टप्प्यात वाशिम, रिसोड, कारंजा येथे विसर्जन; शांतता राखण्याचे पोलीस विभागाचे आवाहन.

गणरायाला आज निरोप
वाशिम, दि. १४- ५ सप्टेंबरपासून जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या गणरायांना १५ सप्टेंबरपासून भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. १५ ते १६ सप्टेंबर असे दोन दिवस टप्प्याटप्याने जिल्ह्यात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत २३८ शहरी व ग्रामीण भागात ४0८ अशा एकूण ६४६ गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, २0९ गावांमध्ये ह्यएक गाव, एक गणपतीह्ण उपक्रम राबविण्यात आला. गणेश मंडळांच्यावतीने विविध उपक्रम घेऊन सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. जिल्हय़ात पोलिसांवरील ताण कमी व्हावा, कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता १५ ते १६ सप्टेंबरपर्यंत दोन टप्प्यात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी वाशिम, रिसोड, कारंजा शहर या ठिकाणी गणेश मूर्तींंचे विसर्जन होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, अनसिंग येथे श्रींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. काही गणेश मंडळांनी पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. मिरवणुकीत सहभागी असलेल्या भक्तांना जेवण दिल्या जाते. या कार्यक्रमाचे आयोजन स्व. शंकरलाल हेडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी नगराध्यक्ष अशोक हेडा व कुटुंबीयांच्यावतीने करण्यात येते.
जिल्ह्यात बचाव पथके तैनात
गणेश विसर्जनादरम्यान दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने बचाव पथके तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी दिली. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी विसर्जनादरम्यान देशी व विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला.
गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून शहरी भागात प्रमुख मार्गांवर तात्पुरत्या स्वरुपात सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने पोलीस विभागाने आढावा घेऊन सीसी कॅमेरे बसविण्याच्या सूचना नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना केल्या. त्यानुसार वाशिम शहरातील प्रमुख मार्गांंवर सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंंत वाशिम शहरातील प्रमुख मार्गांंवर तात्पुरत्या स्वरूपात दुभाजकाची व्यवस्था करून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
-जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गुलालाऐवजी गुलाबांच्या फुलाचा वापर करून तसेच डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करावे. जिल्ह्यात १५ व १६ सप्टेंबर रोजी दोन टप्प्यात गणेश विसर्जन होणार असून, त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. धार्मिक व शांततामय वातावरणात मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. कोणत्याही आक्षेपार्ह कृत्यांना मिरवणुकीमध्ये थारा देऊ नये, तसेच ध्वनिक्षेपकविषयी शासनाने ठरवून दिलेल्या र्मयादेचे सर्वांनी पालन करावे. तसेच मिरवणुकीदरम्यान बेकायदेशीर हत्यार बाळगल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
- प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वाशिम