चिमुकल्यांनी दिला ‘चिमणी बचाओ’चा संदेश

By Admin | Updated: March 23, 2017 02:14 IST2017-03-23T02:14:58+5:302017-03-23T02:14:58+5:30

बालमित्रांनी कारंजा शहरात अभिनव सायकल रॅली काढली.

The message of 'Chimani Bachao' chimukkheya gave them | चिमुकल्यांनी दिला ‘चिमणी बचाओ’चा संदेश

चिमुकल्यांनी दिला ‘चिमणी बचाओ’चा संदेश

कारंजा (वाशिम), दि. २२- जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून स्थानिक बाबरे कॉलनीत पर्यावरण बालमित्रांनी कारंजा शहरात घोषणा देत अभिनव सायकल रॅली काढली.
वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, जंगलतोड, घरबांधणीच्या नव्या तंत्रांमुळे सध्या चिमण्यांना घरटे बांधण्यास जागा उपलब्ध नाही. कारंजातील बाबरे कॉलनीतील चिमुकल्यांनी सायकल रॅली काढून ह्यचिमणी बचाओह्णचा संदेश दिला. या रॅलीत समीक्षा देशमुख, क्षितिज खाडे, शंतनू निंघोट, तन्मय खाडे, नीरज सुरतकर, धनश्री सुरतकर, मंथन राजगुरे, अवंती खाडे, धनश्री काकडे, हर्षा काकडे, वेदांती डफडे, ओम ठाकरे, यश उमेकर, अभय गढवाले, आश्‍विन लाहे, ज्ञानेश्‍वरी बाबरे, भूमी खाडे, शहाकार, चैताली मात्रे यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सायकलीच्या मागे घोषणा फलक लावले होते. रॅलीच्या नियोजनासाठी पर्यावरण मित्र नीता खाडे, गोपाल खाडे व रॅली दरम्यान व्यवस्था व सुरक्षेसाठी संजय मानेकर, नरेंद्र खाडे, अशोक ताथोड यांचे सहकार्य लाभले.

Web Title: The message of 'Chimani Bachao' chimukkheya gave them