वाशिम जिल्हय़ाचा पारा ३९ अंशावर

By Admin | Updated: April 6, 2015 01:58 IST2015-04-06T01:58:52+5:302015-04-06T01:58:52+5:30

नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज; वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात प्रतिबंध हाच उपाय, गडद कपडे वापरणे टाळा.

The mercury of Washim district is 39 degrees | वाशिम जिल्हय़ाचा पारा ३९ अंशावर

वाशिम जिल्हय़ाचा पारा ३९ अंशावर

वाशिम : एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आणि उन्हाचा पारा आणखी वर सरकला. सलग पाच दिवसांपासून वाशिमच्या पार्‍याने ३८ अंश सेल्सिअसपेक्षा उच्चांक गाठला आहे. उन्हापासून आरोग्य जपा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. अंगाची काहिली करणार्‍या उष्णतेची दाहकता दिवसागणिक कमालीची वाढत आहे. परिणामी, जिल्हाभरात उष्माघाताच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालये हाउसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उष्माघाताशी दोन हात करण्यास जिल्हा रुग्णालय सज्ज आहे. सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. दिवसागणिक तापमानात विक्रमी वाढ होत असल्याची नोंद होत आहे. परिणामी जिल्हावासीयांच्या अंगाची काहिली होत आहे. आग ओकणार्‍या सूर्यामुळे जिल्हावासी होरपळत असून, उष्माघाताच्या प्रमाणातही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालये रुग्णांच्या संख्येने हाऊसफुल्ल भरलेली दिसून येत आहे. बहुतांश रुग्णामध्ये ताप येणो, त्वचा कोरडी पडणे, चक्कर येणे, भूक न लागणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, अस्वस्थता वाटणे, बेशुद्धावस्था येणे आदी उष्माघाताची लक्षणे आढळून येत आहेत. उष्माघाताने अद्याप एकही बळी घेतला नसला तरी धारण केलेला रुद्रावतार चिंतनीय असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवित आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ३८ वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४0 ते ४२ अंश सेल्सिअस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो. वाढत्या उन्हाचा परिणाम जलस्रोतावरही होत आहे. नदी, नाले, ओढे कोरडे पडत असून, विहिरीतील पाणी पातळीही कमी होत आहे.

Web Title: The mercury of Washim district is 39 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.