मेहकर येथे चार बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2015 01:49 IST2015-05-21T01:45:09+5:302015-05-21T01:49:17+5:30

जनतेच्या आरोग्यशी खेळ, इजिल्हा आरोग्य पथकाची कारवाई.

Mehkar filed a complaint against four bogus doctors | मेहकर येथे चार बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

मेहकर येथे चार बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

मेहकर (जि. बुलडाणा) : भोळ्याभाबड्या जनतेकडून वैद्यकीय उपचाराच्या नावावर हजारो रुपये उकळणार्‍या चार बोगस डॉक्टरांवर जिल्हा आरोग्य पथकाने २0 मे रोजी कारवाई केली. पोलिसांनी या चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. मेहकर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांत मेडिकल कौन्सिलचे कसलेही अधिकृत प्रमाणपत्र नसताना अनेक जण बोगस डॉक्टर बनून रुग्णांच्या प्रकृतीशी व आरोग्याशी खेळत आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी बुधवारी विविध पथकांच्या माध्यमातून शहरात चार ठिकाणी धाड टाकून संबंधित डॉक्टरांना मेडिकल कौन्सिलच्या प्रमाणपत्राची मागणी केली. यावेळी मिलिंदनगरातील डॉ. लक्ष्मण डव्हळे, संतोषीमाता नगरातील डॉ.सुरेश दीक्षित, झंवर पॉलिक्लिनिकचे डॉ. सुभाष भुतडा व माळीपेठेतील डॉ. कैलास थोरात यांच्याकडे कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यामुळे या चार डॉक्टरांविरुद्ध पथकाने कारवाई केली. यापूर्वी सन २00१ मध्ये बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली होती. त्यात शहरातील सहा जणांविरुद्ध १७ जुलै २00१ रोजी महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ३३ जी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल १४ वर्षानंतर बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. कारवाई करणार्‍या एका पथकाने तालुक्यातील देऊळगाव माळी येथील डॉ. बी. एम. मगर यांच्या दवाखान्यातवरही धाड टाकली; मात्र ते त्याठिकाणी हजर नसल्याने दवाखान्यातील नामफलक व इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई पथकाने केली. या पथकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. कसबे, ए. आर. पबीतवार, डॉ. खिरोडकर, डॉ. सोमवंशी, डॉ. रहाटे यांचा समावेश होता. पोलिसांनी चारही बोगस डॉक्टरविरुद्ध मेडिीकल प्रॅक्टिशनर्स अँक्ट कलम ३३ (२ अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार करीत आहेत.

Web Title: Mehkar filed a complaint against four bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.