मालेगाव मुख्याधिका-यांचा प्रभार मेटकरींकडे
By Admin | Updated: April 17, 2016 01:08 IST2016-04-17T01:08:51+5:302016-04-17T01:08:51+5:30
तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला.

मालेगाव मुख्याधिका-यांचा प्रभार मेटकरींकडे
मालेगाव (वाशिम): येथील नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांना रिसोड येथील कल्पेश वर्मा आत्महत्या प्रकरणात अटक झाल्याने त्यांचा प्रभार मालेगावच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे शनिवारी सोपविण्यात आला. मेटकरी यांच्याकडे प्रभार येताच, ह्यकही खुशी- कही गमह्णची प्रचिती येत असल्याची चर्चा शनिवारी दिवसभर मालेगावात होती. मालेगाव नगर पंचायत झाल्यानंतर प्रशासक म्हणून सोनाली मेटकरी यांनी सहा महिने यशस्वीरीत्या कार्यभार सांभाळला होता. त्यांनीच शहरातील अतिक्रमण हटविण्यात पुढाकार घेतला आणि आठवडी बाजार अतिक्रमणमुक्त केला. नगर पंचायत निवडणुकीनंतर मेटकरी यांच्याकडून प्रशासक पदाचा प्रभार काढून रिसोडचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे यांच्याकडे सोपविला होता. पानझाडे हे मालेगावला फार कमी अवधी देत असल्याने विकासात्मक कामांची गती मंदावली हो ती. त्यातच लेखापाल व अभियंता ही पदे रिक्त असल्याने येथील कारभार ढेपाळला होता. येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा, अशी मागणी शहरातून करण्यात आली. मालेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. स्वच्छता मोहीम, साफसफाई मोहीम, अतिक्रमण हटाव मोहीम, चाका तीर्थ प्रकल्प तसेच रस्ते आदी महत्त्वाच्या कामांच्या पृष्ठभूमीवर येथे ह्यखमक्याह्ण अधिकारी मिळावा, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. आता मेटकरी यांच्याकडे प्रभार आल्याने शहरवासीयांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.