अखिल भारतीय शिक्षक संघाची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:49 IST2021-09-24T04:49:07+5:302021-09-24T04:49:07+5:30

यावेळी तालुका अध्यक्षपदी हरेंद्र ठोंबरे तर सचिवपदी विकास सोनटक्के यांची निवड करण्यात आली. मंगरूळपीर तालुका अध्यक्षपदी तुकाराम हजारे, ...

Meeting of All India Teachers Association | अखिल भारतीय शिक्षक संघाची सभा

अखिल भारतीय शिक्षक संघाची सभा

यावेळी तालुका अध्यक्षपदी हरेंद्र ठोंबरे तर सचिवपदी विकास सोनटक्के यांची निवड करण्यात आली. मंगरूळपीर तालुका अध्यक्षपदी तुकाराम हजारे, सचिव संजय मनवर निवड करण्यात आली.

आयोजित बैठकीला विजय भगत, अशोक मुळे, रउफ शहा, मनोज मनवर यांच्यासह अनेक शिक्षकांची उपस्थिती होती. संचालन सिध्दार्थ ठोंबरे तर अभार विजय भगत यांनी केले.

----------

‘त्या’ आरोपींना शिक्षा करण्याची मागणी

कारंजा लाड ..... परभणी जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे १२ सष्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अपहरण करून सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपीना फाशी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषद कारंजा शाखा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यातील डिघोळ या गावातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीन नराधम आदर्श शिंदे, मजूर मुठाळ व सुशील शिंदे या तिघांनी बलात्कार केला आहे. भेदरलेली अल्पवयीन मुलीने विष प्राशन केले. ही पीडिता मृत्यृशी झुंज देत होती, त्यात पीडितेचा मृत्यू झाला. या तिन्ही आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास राठोड, प्रा वसंत राठोड, विष्णू आडे, किसन आडे, विधाता चव्हाण, अनुराग चव्हाण आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.

Web Title: Meeting of All India Teachers Association