स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेडशीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:02+5:302021-09-18T04:44:02+5:30
मेडशी ग्रामपंचायत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश क स्तर ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेडशीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर
मेडशी ग्रामपंचायत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तालुुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश क स्तर एस. एम. बोहरा यांच्यासह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बडगुजर, गटविकास अधिकारी खिल्लारे, पं.स. सदस्य कौशल्याबाई रामभाऊ साठे, ग्रामपंचायत सरपंच शेख जमीर शेख गणीभाई, वकील संघाचे तालुकाध्यक्ष सतीश शिरसाट, सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता वाघ, ॲडव्होकेट अमोल तायडे यांच प्रमुख उपस्थिती होती. यात शासनाच्या योजना व कायदे विषयक माहितीसह पोटगीविषयक कायदेशीर तरतुदी, सरकारी योजना व वरिष्ठ नागरिकांचे अधिकार याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सचिव मोहन वानखडे, महिला संघाचे अध्यक्ष प्रियाताई पाठक, माजी उपसरपंच शेख रज्जाकभाई, ग्रामपंचायत उपसरपंच धीरज मंत्री, ग्रामपंचायत सदस्य मुलचंद चव्हाण, अमोल तायडे, गजानन झ्याटे, जगदीश राठोड, शिवसेना तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर मुंडे, उमेश तायड़े, प्रशांत मेडशीकर ,अभिजित मेडशीकर, कैलास ढाले, माजी पं.स. सदस्य प्रदीप तायडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिवाणी न्यायालयाचे अधीक्षक चव्हाण यांनी केले.
००००००००००००००००००
ग्रामस्थांचा प्रतिसाद
मेडशी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिराच्या यशस्वितेसाठी संजय भागवत, सुभाष तायड़े, विनोद तायड़े, अजय चौथमल, प्रसाद पाठक, विठ्ठल भागवत, सोहेल पठाण, नीलेश बांगर यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.