शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

वाशिममध्ये होणार वैद्यकीय प्रयोगशाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:28 IST

जिल्हा स्त्री रूग्णालय परिसरात एक महिन्याच्या आत ही प्रयोगशाळा साकारली जाईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत असून, ‘आरटी-पीसीआर’ (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टिड पॉलिमरेज चैन रिअ‍ॅक्शन) वैद्यकीय प्रयोगशाळा उभारणीस शुक्रवारी मंजुरी मिळाली. जिल्हा स्त्री रूग्णालय परिसरात एक महिन्याच्या आत ही प्रयोगशाळा साकारली जाईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने व्यक्त केला.जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविणे आणि रुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारणीकरीता प्रस्ताव सादर केला होता. शुक्रवारी याला हिरवी झेंडी मिळाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास दोन कोटींचा निधी मिळणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात या प्रयोगशाळेसाठी जागेची निश्चिती करण्यात आली. साधनसामुग्री आणि प्रशासकीय कार्यवाही यामध्ये जवळपास २० ते २२ दिवसांचा कालावधी जाऊ शकते, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली. एका महिन्याच्या आत ही प्रयोगशाळा उभारून त्यानंतर जिल्ह्यातच कोरोना चाचणीचे अहवाल तातडीने मिळतील. प्रयोगशाळा उभारणीसाठी आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग पुढील कार्यवाही करीत आहे.

जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तपासणीसाठी स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा असावी यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी व वरिष्ठांनी शासनाकडे पाठपुरावा केला. ‘आरटी-पीसीआर’ (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टिड पॉलिमरेज चैन रिअ‍ॅक्शन) वैद्यकीय प्रयोगशाळा उभारणीस आता मंजुरी मिळाली असून, जिल्हा स्त्री रूग्णालय परिसरात एक महिन्याच्या आत ही प्रयोगशाळा साकारली जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या