शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वाशिम येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर; आमदार पाटणींच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:21 PM

वित्तमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवारांनी वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा विधानसभेत केल्याने जिल्हयात उच्च शिक्षणाची दालन खुले झाले आहे.

ठळक मुद्देआमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी रेटून धरली.वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी विधानसभेत वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली.लवकरचं जागेची पाहणी करुन कामासही प्रारंभ करण्याचा मानस आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राजे वाकाटकांची राजधानी म्हणून ऐतिहासीक वारसा लाभलेल्या वाशीम जिल्ह्यात उच्च शिक्षणांची दालनं खुली करण्याच्या महत्वाकांक्षी उद्देशाने झपाटलेल्या आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रयत्नाला २० जुलै रोजी मोठे यश आले. वित्तमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवारांनी वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा विधानसभेत केल्याने जिल्हयात उच्च शिक्षणाची दालन खुले झाले आहे.वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीशिवाय जलसंधारणांच्या कामासाठी तब्बल १०० कोटी रुपये, वाशीम सह कारंजा येथे ' कॅटल ब्रिड इम्प्रुमेंट सेंटर', अ‍ॅग्रो पोसेसिंग इंन्डस्ट्रिअल हब आदी विकासासाठी पुरक उपलब्धी मिळविण्यातही पाटणी यशस्वी झाले. जिल्ह्याला विकासपथावर अग्रणी करण्यात या सर्व बाबींचे मोलाचे योगदान राहील.सन १९९८ ला जन्माला आलेल्या वाशीम जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोई अद्यापही तोकड्याच आहेत़ परिणामी, येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते़ नेमकी हीच बाब हेरून आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्ह्यात उच्च शिक्षणाची दालनं सुरू व्हावी यासाठी शासनदरबारी रेटा लावणे सुरू केले होते़ गत दोन वर्षांपूर्वी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भाच्या अनुशेषावर सुरू असलेल्या चर्चेत आमदार पाटणी यांनी या मुद्दयाला हात घातला होता़ यावर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाशीम जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय सुरू करण्याची घोषणाही केली होती. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय असेल तेथेच दंत महाविद्यालय सुरू करता येईल असे धोरण मेडिकल कौन्सिलने बनविल्यामुळे प्रस्तावित दंत महाविद्यालय अद्याप सुरू होवू शकले नव्हते. सद्यस्थितीत नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावर बोलताना आमदार राजेंद्र पाटणी यांनी वाशीम जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी रेटून धरली. वस्तुनिष्ठ मागणी, योग्य आकडेवारी व समर्पक उदाहरणांच्या जोरावर पाटणी यांनी मांडलेल्या या भूमिकेची राज्य शासनाने दखल घेतली. राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी विधानसभेत वाशीम येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे आता दंत महाविद्यालयाच्या स्थापनेचा प्रश्नही मार्गी लागला आहे. यासाठी लवकरचं जागेची पाहणी करुन कामासही प्रारंभ करण्याचा मानस आमदार राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केला आहे.सर्व सुविधायुक्त वैद्यकीय महाविद्यालय उभारणारवैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक ते सर्व निकष पूर्ण करुन भव्य इमारतीबरोबरच सीटी स्कॅन, डायलिसीस, एक्स-रे, सोनाग्राफी, ब्लडबँक, ब्लड सेपरेशन युनिट अशा अनेक आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करण्याचा मानस आमदार पाटणी यांचा आहे.

जलसंधारणासाठी १०० कोटीची तरतूद !गोदावरी व तापी खोºयांच्या काठावर वसलेला वाशिम जिल्हा सिंचनाच्या बाबतीत अत्यंत मागासलेला आहे. एक, दोन नव्हेतर तब्बल १२ नद्यांचा उगम जिल्ह्यातून होतो. परंतु दरवर्षी होणाºया पावसाचे पाणी सपशेल वाहून जाते. येथील भौगोलिक परिस्थिती धरणांना अनुकूल नाही. परिणामी, सिंचनाचा अनुशेष दिवसागणिक वाढत चालला आहे. स्वाभाविकच याचा फटका शेतकºयांना सोसावा लागत आहे. ही परिस्थिती बदलायची झाल्यास जिल्ह्यात जलसंधारणाची झाली पाहीजे.या मागणीची दखल घेत वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जलसंधारणाच्या उपाययोजना म्हणून कोल्हापूरी बंधारे, सिमेंट बंधारे, चेकडॅम, माती बंधारे आदींच्या निमीर्ती व दुरूस्तीसाठी तब्बल १०० कोटी रूपयांची भरीप तरतूद केली आहे

वाशीम व कारंजाला 'कॅटल ब्रिड इम्प्रुमेंट सेंटर' मंजूरदेशातील एकूण ११५ मागास जिल्ह्यांमध्ये दुदैर्वाने वाशिमचा सहभाग आहे.जिल्ह्यात १ लाख १७ हजार दुधाळ जनावरे आहेत. मात्र, त्यांची दुग्ध क्षमताअत्यंल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्ध उत्पादन वाढवून शेतकरी सुजलाम सुफलाम् व्हावे यासाठी जिल्ह्यात वाशीम व कारंजा तालुक्यात दोन ' कॅटल ब्रिड इम्प्रुमेंट सेंटर' उभे करावे अशी मागणीही पाटणी यांनी विधानसभेतकेली होती. सदर मागणीची दखल घेत वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत दोन्ही ' कॅटल ब्रिड इम्प्रुमेंट सेंटर' मंजूरीमुळे जिल्हयातील दुग्ध व्यवसायाला भरभराटी येणार आहे. वाशिम जिल्ह्यात उच्च शिक्षणाची दालनं खुली करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू होते. दोन वषार्पूर्वी दंत महाविद्यालयाला मंजूरात मिळवून आणली होती. परंतु मेडीकल कौन्सीलच्या धोरणामुळे अडचण निर्माण झाली होती. गुरूवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वाशीममध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी रेटून धरली. शासनाने या मागणीची दखल घेतवित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा विधानसभेत केली. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल. जलसंधारणासाठी शासनाने जिल्ह्याला १०० कोटींची तरतूद केली. शिवाय वाशीम व कारंजा येथे ' कॅटल ब्रिड इम्प्रुमेंट सेंटर' मंजूर करीतअसल्याची घोषणा केली.- राजेंद्र पाटणी, आमदार, कारंजा विधानसभा मतदारसंघ

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार