मेडशीचा पाणीप्रश्न निकाली निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:29 IST2021-06-05T04:29:19+5:302021-06-05T04:29:19+5:30

मेडशीची लोकसंख्या सुमारे १० हजार आहे. गावातील वाॅर्ड क्रमांक १, ४ आणि ५ हे भाग दरवर्षी पाणीटंचाईने कायम त्रासलेले ...

Medashi's water issue will be resolved | मेडशीचा पाणीप्रश्न निकाली निघणार

मेडशीचा पाणीप्रश्न निकाली निघणार

मेडशीची लोकसंख्या सुमारे १० हजार आहे. गावातील वाॅर्ड क्रमांक १, ४ आणि ५ हे भाग दरवर्षी पाणीटंचाईने कायम त्रासलेले असतात. ही समस्या लक्षात घेता सरपंच शे. जमीर यांनी गावाचा समावेश जल जीवन मिशनमध्ये करण्याबाबत आमदार अमित झनक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. झनक यांनीही दखल घेत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन मेडशीचा पाणीप्रश्‍न तत्काळ सोडविण्याची सूचना केली. गावाचा समावेश जल जीवन मिशनमध्ये करण्याबाबत सुचविले. त्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागला असून लवकरच प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी गावकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती सरपंच शे. जमीर यांनी दिली. याकामी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे, पंचायत समिती सदस्य काैशल्या रामभाऊ साठे, माजी पं.स. सदस्य प्रदीप तायडे, गजानन शिंदे, संजय भागवत, माजी सरपंच रमजान गवरे, उपसरपंच धीरज मंत्री, ग्रामपंचायत सदस्य अमोल तायडे, मुलचंद चव्हाण, जगदीश राठोड, उमेश तायडे, गजानन करवते, ज्ञानेश्वर मुंडे, प्रशांत घुगे यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Medashi's water issue will be resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.