यांत्रिकी कामांतही रणरागिणींची आगेकूच!
By Admin | Updated: July 24, 2015 01:21 IST2015-07-24T01:21:45+5:302015-07-24T01:21:45+5:30
पुरुषी वर्चस्वाला छेद; संध्या मोरे, अर्चना कोटेवार यांची वाटचाल प्रेरणादायी.

यांत्रिकी कामांतही रणरागिणींची आगेकूच!
सुनील काकडे / वाशिम : पुरुषांप्रमाणेच मेकॅनिकचा परिधान केलेला निळा; पण वारंवार वापरात असल्याने काळाकुट्ट झालेला पोषाख.. कामाच्या धावपळीत काळे झालेले हात, काळवंडलेला चेहरा.. असे असताना कामातील एकाग्रता अन् उंचावलेला आत्मविश्वास वाखाणण्याजोगा.. वाशिमच्या एस.टी. वर्कशॉपमध्ये कार्यरत दोन कर्तृत्ववान, जिगरबाज महिलांनी पुरुषी वर्चस्वाला छेद देत या क्षेत्रातही आगेकूच केली आहे. त्यांनी चालविलेली ही परिश्रमपूर्वक वाटचाल इतर महिलांकरिता निश्चितपणे प्रेरणादायी ठरली आहे. संध्या भगवान मोरे आणि अर्चना मधुकरराव कोटेवार असे नाव असलेल्या या दोन विवाहित महिलांनी कुटुंबाची, मुलाबाळांची जबाबदारी लिलया पेलत महिलांच्या दृष्टीने बस दुरुस्तीच्या कठीण कामालाही सहजसोपे करून दाखविले आहे. संध्या मोरे या जानेवारी २0१४ मध्ये, तर अर्चना कोटेवार ह्या डिसेंबर २0१४ मध्ये वाशिमच्या एस.टी. वर्कशॉपमध्ये मदतनीस (हेल्पर) म्हणून रुजू झाल्या. संध्या मोरे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ह्यइलेक्ट्रिकलह्णच्या अभ्यासक्रमात शिक्षण घेतले असून, अर्चना यांनी ह्यपेंटरह्णचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. सध्या या दोघीही बसमधील ऑइल बदलणे, ऑइल लिकेज काढणे, वाहनांना ग्रीसिंग करणे, टायर फिटिंग करणे आदी तुलनेने जड आणि कठीण कामे करीत आहेत.