घरकुलांचा निधी मिळण्यासाठी नगराध्यक्षांचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:07+5:302021-09-08T04:50:07+5:30
६ सप्टेंबर रोजी घरकुल लाभार्थींच्या समस्या नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांनी ऐकून घेत भ्रमणध्वनीद्वारे मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा ...

घरकुलांचा निधी मिळण्यासाठी नगराध्यक्षांचा उपोषणाचा इशारा
६ सप्टेंबर रोजी घरकुल लाभार्थींच्या समस्या नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांनी ऐकून घेत भ्रमणध्वनीद्वारे मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली. घरकुलांचा प्रलंबित निधी त्वरित नगर परिषदेला वर्ग करण्याची अधिकाऱ्यांकडे त्यांनी विनंती केली, तसेच गरीब लाभार्थ्यांना होत असलेल्या त्रासाबाबत अवगत केले.
संबंधित अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात घरकुलांचा प्रलंबित निधी मंगरुळपीर नगर परिषदेला वर्ग करण्यात येईल, असे आश्वासन दिले. असे असले तरी १६ सप्टेंबरपर्यंत त्याची पूर्तता न झाल्यास शहराची प्रथम नागरिक या नात्याने नगरसेवकांसोबत उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा नगराध्यक्ष गजाला खान यांनी दिला. १७ सप्टेंबर रोजी सर्व लाभार्थ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात कोविड नियमांचे पालन करत सहभागी होण्याचे आवाहनही नगराध्यक्षांनी केले.