एसटीच्या चालक-वाहकांनाच मास्कचे वावडे; प्रवाशांचाही विनामास्क प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:34+5:302021-02-05T09:27:34+5:30
(प्रतिनिधी)लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसवर दोन्हीकडून ‘नो मास्क नो प्रवास’, असे फलक लावण्यात ...

एसटीच्या चालक-वाहकांनाच मास्कचे वावडे; प्रवाशांचाही विनामास्क प्रवास
(प्रतिनिधी)लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसवर दोन्हीकडून ‘नो मास्क नो प्रवास’, असे फलक लावण्यात आलेले आहे; मात्र संसर्गाचे संकट अद्याप निवळलेले नसताना अधिकांश प्रवाशांचा ‘नो मास्क’ प्रवास सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक बसचालक व वाहकाचा सुध्दा समावेश १ जानेवारी राेजी लाेकमतने केलेल्या पाहणीवरुन दिसून आला. तोंडाला मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही एस.टी.त प्रवेश देऊ नये, असा नियम करण्यात आला. त्याअनुषंगाने एस.टी.वर ‘नो मास्क, नो प्रवास’ असे लिहून असलेले भलेमोठे फलक दोन्हीकडून लावण्यात आलेले आहेत. परंतु या नियमाचे स्वता एसटी चालक, वाहकच पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे.
..................
बाहेरगावहून माझी पार्सल आली हाेती, ती घेण्यासाठी मी बसमध्ये चढलाे हाेताे. काही मिनिटापुरतेच काम असल्याने मास्क वापरले नव्हते. मास्क नेहमीच वापरताेय परंतु आज वापरण्यात आले नाही. यापुढे नेहमी मास्क वापरण्यात यईल. मास्क वापरणे सर्वासाठी फायदयाचेच आहे.
संताेष मापारी, प्रवासीबाहेरगावहून माझी पार्सल आली हाेती, ती घेण्यासाठी मी बसमध्ये चढलाे हाेताे. काही मिनिटापुरतेच काम असल्याने मास्क वापरले नव्हते. मास्क नेहमीच वापरताेय परंतु आज वापरण्यात आले नाही. यापुढे नेहमी मास्क वापरण्यात यईल. मास्क वापरणे सर्वासाठी फायदयाचेच आहे.
संताेष मापारी, प्रवासी
..............
मी नेहमीच मास्कचा वापर करताेय. बसमध्ये माेठया प्रमाणात गर्दी असल्याने जीव गुदमरत हाेता म्हणून मास्क काढला हाेता. बसमध्ये अनेकांनी तर मास्कच घातला नाही. माझ्याकडे मास्क आहे ताे मी नेहमीच वापरताेय. आजच प्रथम मास्क काढले . नियम कडक करणे गरजेचे आहे.
आकाश डाळ, प्रवासीमी नेहमीच मास्कचा वापर करताेय. बसमध्ये माेठया प्रमाणात गर्दी असल्याने जीव गुदमरत हाेता म्हणून मास्क काढला हाेता. बसमध्ये अनेकांनी तर मास्कच घातला नाही. माझ्याकडे मास्क आहे ताे मी नेहमीच वापरताेय. आजच प्रथम मास्क काढले . नियम कडक करणे गरजेचे आहे.
आकाश डाळ, प्रवासी
.............
मास्कचा वापर करताेय, परंतु नेहमीच कालघाल करावे लागत असल्याने तसेच सतत मास्क घालून ठेवल्याने श्वासाेसास घेण्यास त्रास हाेताेय. प्रत्येक प्रवाशांसाेबत तिकीट काढण्यापासून तर जागेवर बसण्यापर्यंत बाेलावे लागते. मास्क घातल्यानंतर प्रवाशांना ऐकू सुध्दा येत नाही.
दत्ता जाधव बस वाहक, वाशिममास्कचा वापर करताेय, परंतु नेहमीच कालघाल करावे लागत असल्याने तसेच सतत मास्क घालून ठेवल्याने श्वासाेसास घेण्यास त्रास हाेताेय. प्रत्येक प्रवाशांसाेबत तिकीट काढण्यापासून तर जागेवर बसण्यापर्यंत बाेलावे लागते. मास्क घातल्यानंतर प्रवाशांना ऐकू सुध्दा येत नाही.
दत्ता जाधव बस वाहक, वाशिम