विहिरीत उडी घेऊन विवाहित महिलेने संपविली जीवनयात्रा
By Admin | Updated: May 25, 2016 01:44 IST2016-05-25T01:44:20+5:302016-05-25T01:44:20+5:30
कारंजा तालुक्यातील घटना; आत्महत्येचे कारण अज्ञात.

विहिरीत उडी घेऊन विवाहित महिलेने संपविली जीवनयात्रा
पोहा (जि. वाशिम): कारंजा तालुक्यातील आखतवाडा येथील विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. रंजना किसन आठवे (२९) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आखतवाडा येथील रंजना किसन आठवे ही महिला काही दिवसांपूर्वी कारंजा तालुक्यातील पोहा येथे माहेरी आली होती. सोमवारी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास ही महिला शौचासाठी घराबाहेर पडली. ती बराच वेळ परत आली नाही. त्यामुळे माहेरच्या मंडळीने शोधाशोध सुरू केली. अखेर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गावातील लक्ष्मण मणीराम चव्हाण यांच्या शेतातील विहिरीच्या काठावर महिलेची चप्पल आणि शौचासाठी नेलेला लोटा आढळून आला. त्यावरून विहिरीत पाहिले असता, विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. त्यावरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मंगळवार, २४ मे रोजी सकाळी पोलिसांनी विहिरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.