लग्नाचे आमिष दाखवून नेले पळवून; दुसर्याच व्यक्तीशी दिले लग्न लावून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:38 IST2017-09-04T01:38:14+5:302017-09-04T01:38:40+5:30
मालेगाव: येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी युवकाने छत्तीसगड राज्यात पळवून नेले; मात्र तेथे दुसर्याच व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. याप्रकरणी पीडित मुलीने रविवार, ३ सप्टेंबर रोजी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.

लग्नाचे आमिष दाखवून नेले पळवून; दुसर्याच व्यक्तीशी दिले लग्न लावून!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: येथील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी युवकाने छत्तीसगड राज्यात पळवून नेले; मात्र तेथे दुसर्याच व्यक्तीशी तिचे लग्न लावून दिले. याप्रकरणी पीडित मुलीने रविवार, ३ सप्टेंबर रोजी मालेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.
पीडित मुलीने फिर्यादीत नमूद केले आहे, की मालेगाव शहरातील बाळकृष्ण वासुदेव झामरे (वय २६ वर्षे) याने १ ऑक्टोबर २0१६ रोजी लग्नाचे आमिष दाखवून आपणास फूस लावून छत्तीसगड राज्यात पळवून नेले; मात्र तेथे काही महिने सोबत राहून मला कर्करोग असल्याने तू दुसर्या व्यक्तीशी लग्न कर, असे म्हणत भावनिकरित्या ‘ब्लॅकमेल’ करून संबंधित व्यक्तीकडून पैसे घेत आपले लग्न त्याच्याशी लावून दिले, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.