विवाहितेचा छळ : गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 30, 2014 01:37 IST2014-09-30T01:37:41+5:302014-09-30T01:37:41+5:30

किन्हीराजा येथील एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Married to Marriage: Filed a complaint | विवाहितेचा छळ : गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ : गुन्हा दाखल

उळका रेल्वे (वाशिम) : पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किन्हीराजा येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह १0 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेशमा परविन शे. हुसैन असे पीडित विवाहितेचे नाव आहे. तिने तिच्या पतीसह इतर नऊ जणांकडून तिचा शारीरिक वा मानसिक छळ केला जात असल्याची केलेली तक्रार महिला तक्रार निवारणकडे केली. ती तक्रार जऊळका पोलिसांकडे पाठविण्यात आली.
या प्रकरणात जऊळका पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह दहा जणांविरुद्ध कलम ४९८ (अ), ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती जउळका पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार किरण साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका पोलिस करीत आहेत.

Web Title: Married to Marriage: Filed a complaint