जाचाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या
By Admin | Updated: November 17, 2014 00:03 IST2014-11-17T00:03:10+5:302014-11-17T00:03:10+5:30
रिसोड तालुक्यातील दापोरी येथील घटना, पतीसह १६ जणांवर गुन्हा दाखल.

जाचाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या
शिरूपूर जैन (रिसोड, जि. वाशिम): रिसोड तालुक्यातील दापूरी येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहीतेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ नोव्हेंबरला केली आहे. या प्रकरणी विवाहीतेच्या भावाच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीसांनी पतीसह १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सुत्रांकडुन प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दापूरी येथील रहिवाशी शालीक शेषराव जाधव यांचा विवाह पांगरी नवघरे ये थील रहीवाशी शंकर नामदेवराव नवघरे यांची बहिण धृपदा हिच्याशी झाला हो ता. लग्नाला सहा वर्ष लोटली. लग्नाच्या काही दिवसांपर्यंत धृपदा सासरी गुण्या गोविंदाने नांदत होती. तिच्या सासरच्या मंडळीने तिला आनंदात नांदविले. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळीने तिचा जाच करणे सुरू केले होते. काही वेळा माहेरवरून पैसे आणण्यासाठी देखील धृपदाचा छळ होत होता. सासरच्या मंडळीचा हा जाच असह्य झाल्याने धृपदाने १६ नोव्हेंबरला येवता शिवारातील एका विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी धृपदाचा भाऊ शंकर नवघरे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीसांनी धृपदाचा पती शालिक जाधव, सासरा शेषराव जाधव, सासू गोदावरी जाधव, दिर शंकर जाधव, जाऊ किरण जाधव ननंद प्रयाग जाधव यांच्या विरूद्ध कलम ४९८, ३0६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.