कोरोनामुळे विवाह सोहळे लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST2021-04-28T04:44:36+5:302021-04-28T04:44:36+5:30
एप्रिल-मे महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस. मात्र, यावर्षीसुद्धा लग्नासारख्या शुभकार्यात कोरोनाचे विघ्न निर्माण झाल्याने मागील काळात ठरलेले विविध ...

कोरोनामुळे विवाह सोहळे लांबणीवर
एप्रिल-मे महिना म्हणजे लग्नसराईचे दिवस. मात्र, यावर्षीसुद्धा लग्नासारख्या शुभकार्यात कोरोनाचे विघ्न निर्माण झाल्याने मागील काळात ठरलेले विविध भागांतील अनेक विवाहसोहळे लांबणीवर पडले आहेत . वर-वधू पक्षाने लग्न जुळल्यानंतर लग्नाची तयारी केली होती. मात्र, कोविडचे संकट आणि निर्माण झालेल्या अडचणी ओळखून ठरलेले विवाह सोहळे स्थगित करून ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की वधू-वर मंडळींवर आली. काहींनी तर विवाह सोहळ्यांसाठी केलेले हॉल बुकिंगही रद्दही केले होते . कॅटरिंग, बँजो आदी ऑर्डरीही रद्द करण्यात आल्या होत्या. काही वधू-वर मंडळींनी लग्नकार्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करून तयारीही केली होती. मात्र,नाईलाजाने त्यांना विवाह सोहळे स्थगित करावे लागले होते. त्यातल्या त्यात मध्यंतरी काहींनी मोठा थाटमाट आणि गाजावाजा न करता लग्नकार्ये उरकूनही घेतली आहेत. विवाह सोहळे लांबणीवर पडल्याने अनेक वधू-वर मंडळी निरूत्साही बनली आहे. डेकोरेटर्स, कॅटरिंग , बँडवाले आदी लहान-सहान घटकही अडचणीत आले आहेत.