मतदानाच्या सकाळी बाजारपेठ राहणार बंद
By Admin | Updated: September 25, 2014 01:25 IST2014-09-25T01:25:04+5:302014-09-25T01:25:04+5:30
वाशिम जिल्ह्यातील व्यापारी संघटना व प्रशासनाने साधला समन्वय.

मतदानाच्या सकाळी बाजारपेठ राहणार बंद
वाशिम : विधानसभा निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना व्यापारी संघटना सहकार्य करणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व दुकाने मतदानदिवशी सकाळी ११ वाजेपयर्ंत बंद ठेवली जातील, अशी माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्यापारी व निवडणूक विभागाच्या अधिकार्यांच्या अनौपचारिक बैठकीत दिली. आगामी दोन दिवसांत पत्रकाद्वारे सर्व व्यापार्यांना याविषयी आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी १५ ऑक्टोंबरला विधानसभेचे निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेकडुन जनजागृती करण्यात येत आहे .याच पृष्ठभूमिवर मतदान विषयक जनजागृतीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सी. सेंथील राजन यांच्या उपस्थितीत जिल्हा निवडणूक विभागाने व्यापारी मंडळासोबत बैठक घेतली. मतदानाच्या दिवशी सकाळी ११ वाजेपयर्ंत दुकाने बंद ठेवण्याच्या व्यापारी संघटनेच्या निर्णयाचे निवडणूक निरीक्षक सी. सेंथील राजन यांनी स्वागत केले. तसेच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापारी मंडळींनीही मतदार जागृती करण्याचे आवाहन केले.