बाजार समितीतील हमाल संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 19:27 IST2017-09-25T19:26:47+5:302017-09-25T19:27:10+5:30

मालेगाव (वाशिम) - हमाली मापाईच्या दरवाढीसंदर्भात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल बांधवांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यासंदर्भात २५ सप्टेंबर रोजी मालेगाव ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.

Market Stage | बाजार समितीतील हमाल संपावर

बाजार समितीतील हमाल संपावर

ठळक मुद्देसोमवारपासून पुकारला बेमुदत संप हमाली मापाईच्या दरवाढीसंदर्भात मालेगाव ठाणेदारांना दिले निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) - हमाली मापाईच्या दरवाढीसंदर्भात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल बांधवांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यासंदर्भात २५ सप्टेंबर रोजी मालेगाव ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.
हमाल मापारी संघटनेने   निवेदनात म्हटले की, हमाली मापाईचे    दरवाढीबाबत यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती व सहाय्यक निबंधक यांना निवेदन दिले होते. अद्यापपर्यत काहीच कारवाई झाली नाही. दरवाढ होत नसल्याने २५ सप्टेंबरपासून हमाली व मापाई बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राजू पट्टेबहाद्दूर, नाथा पट्टेबहाद्दुर, अशोक धबडधाव आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Market Stage