पैशासाठी विवाहितेचा छळ; सहा आरोपींवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:18 IST2021-03-04T05:18:26+5:302021-03-04T05:18:26+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा नंदकिशोर बरडे (वय ३०, रा.कोळसा, ह.मु. गिरोली, ता.मानोरा) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले ...

Marital harassment for money; Crimes against six accused | पैशासाठी विवाहितेचा छळ; सहा आरोपींवर गुन्हा

पैशासाठी विवाहितेचा छळ; सहा आरोपींवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा नंदकिशोर बरडे (वय ३०, रा.कोळसा, ह.मु. गिरोली, ता.मानोरा) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिच्या पतीने अंधारात ठेवून आधीच दुसरे लग्न केले होते. ही बाब लग्नाच्या वर्षभरानंतर आपणास माहीत झाली. तरीदेखील परिस्थिती स्वीकारून पतीसोबतच नांदण्याचा निर्णय घेतला; मात्र घरातील इतर मंडळींनी पतीला माझ्याविरोधात भडकावून शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले व माहेरावरून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. त्याची पूर्तता न केल्यामुळे मला घरातून काढून दिले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून व महिला तक्रार निवारण कक्षाच्या आदेशावरून मानोरा पोलिसांनी आरोपी नंदकिशोर विठ्ठल बरडे, विठ्ठल चेंडाजी बरडे, प्रमिला उत्तम बरडे (सर्व रा.कोळसा) आणि विजयमाला धरमसिंह रावत (रा.बेलापूर, मुंबई), अनुसुला अवधूत मोहड (रा.धनसूली, मुंबई) अशा सहा आरोपींवर भादंविचे कलम ४९८ ‘अ’, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मानोरा पोलीस करीत आहे.

Web Title: Marital harassment for money; Crimes against six accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.