विवाहितेचा छळ; आठ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:43 IST2021-05-21T04:43:46+5:302021-05-21T04:43:46+5:30

फ़िर्यादी सुरेखा सूरज गायकवाड, ह.मु. रोहना, ता.मानोरा यांच्या तक्रारीनुसार, नवीन चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये आण, या ...

Marital harassment; Crime on eight people | विवाहितेचा छळ; आठ जणांवर गुन्हा

विवाहितेचा छळ; आठ जणांवर गुन्हा

फ़िर्यादी सुरेखा सूरज गायकवाड, ह.मु. रोहना, ता.मानोरा यांच्या तक्रारीनुसार, नवीन चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये आण, या मागणीसाठी सासरची मंडळी शारीरिक व मानसिक छळ करीत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत फिर्यादी ही सुखाने संसार करीत होती. पती सूरज गायकवाड, रा.अंतरगाव, ता.दारव्हा हा मोटार ड्रायविंगचे काम करीत असल्याने त्याला स्वत:ची नवीन चारचाकी गाडी घ्यायची आहे. त्यासाठी माहेरावरून एक लाख रुपये आण असा तगादा लावून पतीसह अन्य सात जणांकडून मारहाण झाली. त्रास असह्य झाल्याने पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. महिला समुपदेशन केंद्र कारंजा यांच्या अहवालावरून मानोरा पोलिसांनी पती सूरजसह अन्य सात जणांविरुद्ध कलम ४९८, ५०४, ५०६ भादविप्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर प्रकरणाचा अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहे.

Web Title: Marital harassment; Crime on eight people