शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

शिरपूर येथील विकास कामातील अनियमिततेसंदर्भात १५ मार्चला सुनावणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:32 PM

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्राम पंचायतच्या विकास कामातील अनियमिततेबाबत १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्राम पंचायतच्या विकास कामातील अनियमिततेबाबत १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे शिरपूरसह मालेगाव तालुक्याचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाºयांच्या चौकशी अहवालानुसार ही सुनावणी होणार आहे. शिरपूर जैन येथील माजी सरपंच सुशांत जाधव, गणेश भालेराव यांच्यासह ग्राम पंचायतच्या सात सदस्यांनी चौदाव्या वित्त आयोगातील कामात गैरप्रकार  झाल्याची तक्रार १४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीमध्ये  जाधव यांनी नमूद केले होते की, विकास कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली. निविदाची मर्यादा १५ दिवस ठेवणे बंधनकारक असताना केवळ सात दिवस ठेवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते. सदर प्रकार इतक्यावरच न थांबता ज्यादिवशी ई निविदा उघडण्यात आली, त्यादिवशी सदर कंत्राटदारास धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्यात आली. एकाच दिवसात निविदा उघडून कंपनीने २६ लाखाचे काम करणे हे शक्य नसल्याचे तक्रारकर्त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यांच्या तक्रारीवरून प्रशासनाने २८ जानेवारी रोजी ग्रामपंचायतचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये एकाच दिवशी निविदा उघडून त्याच दिवशी कंत्राटदाराला काही रकमेचा धनादेश दिल्याचे सिद्ध झाल्याचा अहवाल  पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाºयांमार्फत तक्रारकर्त्यांना प्राप्त झाला आहे. या अहवालात सरपंच, सचिव व अभियंता यांनी या कामात अनिमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या चौकशी अहवालावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ३ मार्च रोजी निर्णय घेणार होते. मात्र आता ही सुनावणी १५ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे या प्रकरणावर १५ मार्च किंवा त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे शिरपूरसह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.  या प्रकरणाची चौकशी विस्तार अधिकाºयांमार्फत पूर्ण झाली आहे. यामध्ये सरपंच, सचिव व अभियंता यांनी अनियमितता केली असल्याचा अहवाल चौकशी अधिकाºयांनी दिला आहे. मात्र यावर अजूनही निर्णय देण्यात आला नाही. लवकर निर्णय मिळणार नसेल पर याप्रकरणी आम्ही न्यायालयात जावू.-सुशांत जाधवमाजी सरपंच शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन